Hi, Friends Here You Can Read {Marathi Story}, Motivational Marathi Story, Best Marathi Story, Horror Marathi Story, Interesting Marathi Story.
1) Marathi Story
एका संध्याकाळी मला माझ्या एका मित्राचा फोन आला . तुझ्या कड़े रमेशचा फोटो आहे का ?
मी त्याला विचारल का रे काय झाल …. माझ्याकडे नाही फोटो त्याचा .
तर तो म्हणाला … अरे त्याच्या मुलीने मागितला आहे .
का तिच्या कड़े असेल की घरी .. ती तुझ्याकडे का मागत आहे … मी प्रति प्रश्न केला .
ते मला नाही माहीत . मी तिला नाही म्हंटल्यावर् . ती गप्प झाली आणि निघुन गेली . पण काहीतरी गड़बड़ आहे अस वाटत आहे . तू तिला भेट आणि बघ काय प्रकार आहे .
मी थोड़ा विचारात पडलो . काय गड़बड़ आहे ही . रमेशची मुलगी त्याचा फोटो दुसर्याकडे का मागत आहे . घरातले फोटो का घेत नाही . तिला भेटायला पाहिजे ..
रमेश म्हणजे माझ्या सोसायटी मधला मित्र . रोज भेटणारा . Hi Hallo करणारा . पाच वर्षा पूर्वी एका accident मध्ये मेला . त्याला एक मुलगी आहे … सानिका … तिच ही .
तो मेला तेव्हा ती नऊ वर्षाची होती . लहान होती . तिला मी लहानपणा पासून बघतोय . आई बरोबर असली की मला ती मामा म्हणायची आणि तिच्या पप्पा बरोबर असली की काका … अस दोन्ही कडून मला नात लावायची . रमेश आणि तिच्या मध्ये प्रचंड लळा … प्रचंड प्रेम दोघांमध्ये . आम्ही तिला पप्पाच् शेपुट म्हणायचो . कायम दोघे बरोबर .
रमेशच प्रेत आणल्यावर ती गड़बडून गेली होती . फ़क्त पप्पा पप्पा म्हणून त्याला हलवुन … उठना उठना … घरात चल . एव्हड़च बोलत होती . प्रेत घेऊन जाताना खूप रडली होती .
रमेश गेल्यावर खूप कमी वेळा भेटली . अंतर्मुख झालेली . भेटलो की काय बोलाव या मनस्थितित असणारी किंवा डोळ्यात टचकन पाणी आणून फ़क्त पप्पा म्हणून रडणारी . तेव्हा आम्हा मित्रांच्या पण डोळ्यात पाणी यायच . पण काही करु शकत नव्हतो . तिची आई तिला ओढ़त घेऊन जायची . तिच्या आईने पण नंतर रमेशच्या सगळ्या मित्रांशी बोलण सोडून दिल .
यंदा ती दहावीला होती . क्लास वरुन सहाच्या सुमारास येते . अस माझ्या लक्षात आल होत . बहुतेक वेळा ती त्याच वेळेला मला दिसली होती . मी संध्याकाळी तिची वाट बघत माझ्या मित्राच्या मेडिकल मध्ये थांबलो . नजर तिलाच शोधत होती .
मला ती सायकल वर येताना दिसली . तसा मी पुढे जाऊन तिला हाक मारली . ती पण जवळ येऊन थांबली .
मी तिला विचारल . तुला तुझ्या पप्पाचा फोटो कश्याला हवाय . घरात फोटो आहेत ना !
तर ती म्हणाली … नाही काका … फोटो नाहीत घरात . पप्पा गेल्यावर मी सारखी त्यांची आठवण काढ़त होते .. म्हणून आई ने तेव्हाच सगळे फोटो कोठे तरी लपवून ठेऊन दिले . मी तेव्हा पासून पप्पाला बघितलच नाही . मला त्यांची खूप आठवण येते . म्हणून तिचा चेहरा रडवेला झाला .
आता मी दहावीला आहे . खूप वेळ बाहेर असते म्हणून आईने फोन घेऊन दिला आहे . म्हणून मला पप्पाचा फोटो हवा आहे . मी त्यात save करून ठेवेन.
मला पण भरून आल होत . तिने तिच्या लाडक्या बापाला गेली पाच वर्ष तरी बघितल नव्हतं . एका लहान मुलीने या भावना कश्या पेलल्या असतील ? आठवण आल्यावर ती काय करत असेल ? मी याच विचाराने बेजार झालो होतो .
मी तिला सांगितल . बेटा मी तुझ्या पप्पाचा फोटो तुला मिळवून देतो . मिळाल्यावर तुला फोन करतो . म्हणून मी तिचा नंबर घेतला .. माझा दिला आणि निघालो .
मला त्याच्या कामाच्या ठिकाणचे काही मित्र माहीत होते . त्यांच्या रोजच्या बसण्याच् एक ठिकाण होत . तिथे मी दुसऱ्या दिवशी गेलो . मला त्याचे काही मित्र भेटले . मी त्यांना सगळ सांगितल . हे सगळ ऐकून ते स्तब्ध झाले . त्यांनाही सानिकाचा लळा होता . लहान पणापासून त्यांनीही तिला बघितले होते .
प्रत्येका कड़े रमेशचे फोटो होते . पार्टी मधले .. पिकनिक मधले . प्रत्येकजण मोबाईल मध्ये त्याचे चांगले कोणते फोटो आहेत हे शोधण्यात गुंतले होते .
चांगले जवळ जवळ 100 पेक्षा जास्त फोटो निघाले . मी त्यांना ते मला mail करायला सांगितले . मी पण खुश होतो . एका बाळाला तिच्या पप्पाला भेटवणार होतो .
मी त्या फोटो मधल्या एका चांगल्या फोटोची color print काढली आणि संध्याकाळी सानिकाला फोन करून बोलावले आणि तिला दिला . ती त्या फोटो कड़े एकटक बघत होती . ती कधी माझ्या कड़े तर कधी रमेशच्या फोटो कड़े बघत हसत पण होती आणि रडत पण होती . दोन्ही भाव एकाच वेळी तिच्या चेहऱ्यावर दिसत होते .
मी तिच्या चेहर्यावरचे दोन्ही भाव टिपत होतो . ती माझ्यासाठी पण बाळच आहे . मला तिला जवळ घ्यावे असे वाटत होते . पण तसे नाही करु शकलो . मी तिच्या कडून तिचा mail id घेऊन बाकीचे फोटो mail करतो असे सांगून निघुन आलो .
मी घरी आल्यावर माझ्या मुलीला खूप वेळ जवळ घेऊन बसलो होतो . मलाही भावना अनावर झाल्या होत्या .
तेव्हा पासून मी माझ्या प्रत्येक मित्राला सांगत असतो …. गाडी हळू चालवा . तुमच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना तुमची खूप ग़रज आहे . तुम्ही त्यांच्या साठी मौल्यवान आहात . तुमच्या नंतर त्यांना खूप त्रास होतो अगदी आयुष्यभर .
खरच प्रत्येकाला एक तरी मुलगी असायला हवी . आपण जिवंत असताना आणि आपण मेल्या नंतरही आपल्यावर प्रेम करणारी फ़क्त आपली मुलगीच् असू शकते .
Marathi Story – Navin Arey.
2) Best Marathi Story
नमस्कार मित्रांनो, मी आशिष क्षिरसागर तुम्हाला एक खतरनाक किस्सा सांगत आहे. हि घटना मी आणी माझा मित्र सोमनाथ निफाडे याने अनुभवली आहे. माझ्या मागिल स्टोरीला दिलेल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
तर मी स्टोरीला सुरुवात करतो. तर माझा मित्र सोमनाथ याला आम्ही पप्पु म्हणतो, त्याचे काका म्हणजे त्याच्या वडीलांचे चुलत भाऊ खुप आजारी होते. काकांचे पप्पुवर खुप प्रेम होते अगदी पप्पु लहान असल्यापासुन काकांचा तो खुप लाडका होता. काका त्याचे सर्व हट्ट पुरवियाचे. पण आता काकांची तब्येत फारच खराब झाली होती. त्यामुळे आता डॉक्टरांनी पण काकांना घरी घेवुन जाण्यास सांगितले. आणी काका दुपारी 3 वाजेच्या दरम्यान या त्यांच्या देहाला सोडुन गेले. पाव्हणे वैगेरे जमतांना खुप ऊशिरझाला.अत्यविधी साधारनतः रात्री 10 वाजले होते. तर आम्ही घरी आलो. पण पप्पु आणी मला सारखी कुनाच्यातरी अस्तित्वाची जाणिव होत होती.
रात्री साधारनतः 2.30 वाजता पप्पु आणी मला घरातील मोठ्या माणसांनी चिता सावरुन यायला सांगितले कारण तिथे सर्वात जास्त डेरीँगबाज आणी तरुण आम्हीच होतो. स्मशानात चितेसाठीच्या ओट्याला रॅलिँग नसल्याने चितेची लाकड खाली ढसळतात त्यामुळे नंतर जाऊन ते सावरुन याव लागत. तर स्मशान गावापासुन साधारनतः 1 कि. मी. दुर असल्याने मी आणी पप्पु माझ्या पल्सर 180 वर स्मशानात जायला निघालो. जेव्हा आम्ही स्मशानात पोहोचलो तेव्हा तेथील वातावरण जबरदस्त भयानक वाटत होत. हवेत गारवा जाणवत होता शांतता ईतकी भयान होती की काळीज हेलकावत होती मधुनच टिटवीच्या ओरडण्याचा आवाज येत होता. आणी सतत अस जाणवत होत की आमच्या व्यतिरीक्त अजुन कुनितरी आहे.
आम्ही चितेच्या जवळ पोहोचलो. मी गाडी चितेच्या एकदम जवळ लावली आणी गाडीला सेँटर लॉक असल्याने गाडी रिमोटने पण चालू होत होती. आम्ही पाहील की त्या जळत्या प्रेताचा अर्धवट जळालेला हात चितेच्या बाहेर आलेला होता चेहरा आणी छातीवरील लाकडे ढासळल्याणे ते ईतक भयानक दिसत होत कि चेहर्याचा अर्धा भाग जळालेला त्यातुन त्याची कवटी स्पष्ट दिसत होती. पप्पु आणी मी तस मनातुन घाबरलेलो होतो पण एकमेकांना दाखवत नव्हतो पप्पुने जवळच असलेली काठी उचलली आणी त्या प्रेताचा हात चितेत ढकलन्याचा प्रयत्न केला. तेव्हड्यात त्या प्रेताचा हात तुटून खाली पडला.
आम्ही तर आता पुर्ण घाबरलो. तरी पण पप्पुने डेरीँग करुण तो हात ऊचलला आणी चितेत टाकला. मी पण पटापटा लाकड ऊचलली आणी चितेवर टाकली. तेव्हड्यात माझ लक्ष तिथुन जवळच असलेल्या एका झाडाकडे गेल. मी पाहिल कि ती दुसर तिसर कूणी नसुन पप्पुच्या काकांच भुत होत.
जस ते प्रेत जळत होत तस तस ते भुताच मांस पण वितळल्या सारख दिसत होत. डोळे ईतके लालबुंद होते की स्पष्ट दिसत होते पप्पु आणी मी एकटक त्या भुता कडे पाहत होतो. पण आम्ही आगिच्या जवळ असल्याने ते भुत आमच्या पर्यत येऊ शकत नव्हत. मग पप्पु मला हळु आवात बोलला कि तु रिमोटने गाडी चालु कर. तो पर्यँतर आम्ही त्या चिते जवळच होतो. मी रिमोटने गाडी चालु केली आणि पप्पुने चितेतुन एक जळत लाकुड हातात घेतल आणी आम्ही पटकण गाडीवर जाऊन बसलो. पप्पूच्या हातात जळत लाकुड होत आणी मी गाडी सुरु केली मागे बघतो तर काय ते भुत पण आमच्या मागे येत होत.
मी जोरात गाडी पळवत होतो तस तस भुत पण आमच्या मागे पळत होत. मागुन पप्पु म्हणत होता अशु गाडी पळव ते जवळ येतय मी पण रस्त्याचा आणी खड्यांचा विचार न करता गाडी पळवत होतो. शेवटी गाव जवळ आल्याने त्या भुताने आमचा पिछा सोडला.आम्ही जेव्हा घरी पोहचलो तेव्हा मी खुप घाबरलेलो असल्याणे गाडीचे ब्रेक दाबायचे विसरुनच गेलो आणी सरळ भिंतीवर धडकलो. घरच्यांनी जेव्हा आम्हाला ऊचलल तेव्हा पप्पु बेशुध्द पडलेला होता.
मला तर काहि बोलताच येत नव्हत थोड्या वेळाने पप्पु शुध्दीवर आला आणी घडलेला सर्व प्रसंग घरी सांगितला. मग माझ्या आजीने दोन लिँब आनूण आमच्या वरुन ओवळली आणी कापुन दोन दिशांना फेकुन दिली. नंतर आम्हाला तेराव्याची पुजा होई पर्यँत तिकडे न जान्यास सांगितल. तर असा हा आमच्या वर घडलेला किस्सा आयुष्य भर लक्षात राहील.
कसा वाटला माझा किस्सा मित्रांनो आणी मैत्रिनींनो जरुर कळवा.
Marathi Story :- आशिष क्षिरसागर.
3) Marathi Story 2022
नमस्कार मित्रांनो, मी अंकुषा आज ही कथा सांगते ती स्वतः माझ्या बाबतीत घडली आहे. माझ्या गावी मी 7 वी ला होते तेव्हा मी माझे पूर्ण कुटुंब गावी गेलो होतो माझ्या काकांच्या लग्नाला.
लग्न खूपच छान पार पडले. पण काकीला अडचण आली होती तिच्या लग्नानंतर ठीक संध्याकाळी आमच्या गावी हे दिवस पाळले जातात आणि त्यात हळद देखील ऊतरवली नव्हती. त्यामुळे आम्हाला आईने त्यांच्या खोलीत बसवून ठेवले. कारण त्या काळी विजेचा पुरवठा नव्हता. आणि त्यात संपूर्ण घरात फक्त लामणदिव्याचा ऊजेड काकीच्या खोलीत तितकासा ऊजेड नव्हता आणि त्यात फार ऊकडत होते म्हणून काकीने मागच्या पडविचा दरवाचा ऊघडा करून ठेवला आम्ही काकिला स्पर्श होऊ नये म्हणून तिच्या समोर बसलो होतो.
तेव्हा पावसाळ्यात लाकडे भरुन ठेवली जात होती. ते नेमके काकीच्या खोलीच्या समोरच होती मी काकिकडे पाहून बोलत असताना अचानक माझी नजर त्या दरवाज्यासमोर असलेल्या लाकडाच्या ओंडक्याकडे गेली. तर मला तिथे एका बाईची आकृती दिसली ती दिसत नव्हती पण तिचे डोळे हि-यासारखे चमकत होते.
मला वाटले कि मला भास होत असेल म्हणून मी दृर्लक्ष केले पण का कुणास ठाऊक चोरुन नजर तिथेच जात होती आणि ती नजर मलाच रोखून पाहत होती बाहेर जायलाही मिळत नव्हते कारण काकी एकटीच होती पाहून न पाहिल्यासारखे केले तरि पण लक्ष तिथेच होते आणि मग मी माझ्या काकांच्या मुलीला हळूच ईशारा केला पण तिने दृर्लक्ष केले काय माहित कदाचित तिला माहित असेल. मग काकीने झोपताना तो दरवाजा लावुन घेतला म्हणून मी चोरून खिडकितून चोरुन पाहिले तर तिथे कोणीच नव्हते.
मग काय माझे अवसानच गळाले आणि मी हा प्रकार आईला सांगितला आणि नेहमी प्रमाणे तिने मला भास झाल्याचे जाणवले. म्हणून मी काहीही न बोलता खेळायला निघून गेले पण दुस-या दिवशी मी पुन्हा गेले ती जागा पहायला पण तिथे काहिच नव्हते. पण आईने काकीला विचारले कि रात्री तिला कसला भास झाला का तर ती पण नाहीच बोलली तेव्हा मला कळले की आईने मी घाबरु नये म्हणून टाळाटाळ केली असेल. पण तिथे काहितरी होते हे नक्कि .
Marathi Story :- अंकुषा.
4) Marathi Story Katha
नमस्कार प्रिय मित्र आणि मैत्रिणीनो मी आज तुम्हाला मला स्वताला आलेला अनुभव शेअर करणार आहे. हि गोष्ट साधारण पणे २००० साल ची आहे, आणि माझ्या आईसोबत घडलेली सत्य घटना आहे, मी ८ वीत असताना आम्ही ठाणे जिल्या मधील कसारा या शहरात राहण्यास होतो. तिथे नेहमीच पाण्याची कमतरता असते आणि लाईट चा पण भरवसा नसतो… त्या काळात सुद्धा पाण्याची खुपच कमतरता होती, दर १५ दिवसांनी नळाला पाणी यायचे त्यामुळे सर्व लोकाचे हाल व्हायचे, लोक १५ दिवसाचे पिण्याचे पाणी एकदाच भरत असत. माझी आई सुद्धा एकदाच पाणी भरत असे पण रोज वापरायचे कपडे किती दिवस साचवुन ठेवुन धुणार त्यासाठी आईने एक युक्ती केली.
आमच्या इथून १.५ किमी अंतरावर स्मशानभुमी आहे आणि पुढे मरे आइच देऊळ आहे…आणि देवळापासुन थोडे रस्त्याच्या खाली उतरून आल्यावर प्रख्यात धावडोबापाचे मंदिर आहे आणि अगदी ५ मिनिटाच्या अंतरावर छोटा ओढा आहे….आणि त्या ओढयाच्यच वरून रेल्वेचा रुळ आहे….त्या रुळावरून नेहमी लोकल ट्रेन ये जा करत असते…. हा सर्व भाग जंगलाने व्यापलेला आहे त्यामुळे तेथे सहसा लोक तिकडे जात नाहीत…आईने कपडे धुण्यासाठी तिथे जायचे ठरवले त्यानूसार आइला थोडी फार मदत आणि सोबत म्हणुन मी आणि माझे बहीण भाऊ जात असत.
असेच काही दिवस आम्ही गेलो तेव्हा आम्हाला काही एवढे जाणवले नाही…पण अचानक आई घरात विनाकारण चिडचिडपणा करू लागली… क्षुल्लक कारणांवरुन आम्हा सर्वाच्या म्हणजे मी, बहीण आणि भावाच्या अंगावर धावून यायची.. सुरवातीला आम्ही दुलक्ष केले पण हल्ली आई एकटी किचन मध्ये असताना बडबड करत असे..असे वाटे कोणाशी तरी धुसपुस करत बोलत आहे… आम्हाला सर्व बाहेर हॉलमध्ये असताना थोड थोड एकायला येत असे पण स्पष्ठ असे काही नव्हते समजत…आम्ही विचारायला गेलो असता शांत बसायची आणि बोलायची कुठं मी कुणाशी बोलतेय ….मी तर काम करतेय.
आम्ही तिघे लहान असल्याने आणि काही समज नसल्यामुळे वडिलांना यातल काही सांगितले नाही….काही दिवसांनी माझ्या परीक्षा असल्यामुळे आईसोबत जाऊ शकले नाही …आई आणि बहिणच जात होती…लहान भाऊ खेळायच आहे म्हणुन घरी राहु लागला..दिवसेंदिवस आइचे एकटे बडबड करणे वाढु लागले…आता मात्र आम्हा भावंडांना आईची भीती वाटु लागली..कधीकाळी नेहमी आम्हाला माया लावणारी आणि भरभरून प्रेम करणारी आई आमचा तिरस्कार करु लागली…एकटीच शांत बसु लागली.. वडिल सुद्धा दिवसभर काम करून दमुन घरी येऊन झोपत…माझी शाळा सकाळची असल्याने मला सकाळी ५.३० ला ऊठावे लागायचे.
मी लवकर उठून आईला थोडी कामात मदत करत असे व माझे आवरुन शाळेत जात असे.. असेच एकदा मी सकाळी शाळेत जाण्यासाठी ऊठले असताना लाईट गेली तर तसेच मी मेणबत्तीच्या उजेडात आंघोळ केली… आमचे बाथरूम अगदी शेवटच्या रुम मध्ये आहे…तिथे नेहमीच अंधार असतो ..फक्त लाईटचाच काय तो ऊजेड असायचा आणि अशातच लाईट गेली असल्यामुळे मी लवकरात लवकर त्या रुममधुन बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होते.
मी दरवाजा खुला ठेवून आणि दाराकडे पाठ करून कपडे घातले आणि मागे वळली आणि मी जे पाहिले त्यामुळे माझा फक्त जीवच जायचा बाकी होता….माझी आई एकदम माझ्यासमोर उभी होती… आमच्या दोघींमध्ये वीतभर सुद्धा अंतर नव्हते…ती मोठ्ठे मोठ्ठे डोळे करुन एकदम डोळयात डोळे घालून माझ्या कडे एकटक पाहत होती आणि विक्रुत हास्य करत होती आणि मान डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडुन डावीकडे वळवत होती. हे पाहुन मी खूप घाबरले त्यातच रुममध्ये खूप अंधार होता फक्त मेणबत्तीचाच काय तो थोडाफार उजेड होता…भीतीने माझी गाळण उडाली.
तेवढयात मला काय सुचले देव जाणे मी आईला एकदम जोरदार “आई”अशी मारली आणि तिला तिच्या दोन्ही खादयांना धरून गदागदा हलवले तेव्हा कुठे ती भानावर आली …आणि मला बोली काय झाले …यावर मी तिला विचारले तुला काय झाले? तिने उत्तर दिले कुठे काय झाले मला असेच काही दिवस गेले …माझ्या वडिलांनी ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत गोवा सहलीचा बेत केला त्यानुसार सर्व सहकारी आपापल्या कुटुबांसोबत सहलीला येणार होते.. फिरायला जायचे आहे म्हणुन वडिलांनी सर्वासांठी खरेदी केली.
सर्व काही तयारी झाली असताना दुसऱ्या दिवशी निघायचे असताना मध्यरात्रीच्या सुमारास आई मोठ्या मोठ्याने ओरडायला लागली, रडायला लागली, किचांळायला लागली,माझे वडील चितांग्रस्त होउन आईजवळ गेले तसे आईने त्यांना धक्का दिला तसे ते ५ फुट मागे ढकलले गेले… वडिलांना कळुन चुकले की हे प्रकरण काहीतरी वेगळच आहे….ते तसेच कितीतरी वेळ आईच्या हाताला धरून बसले होते..मध्येच आई बोलायची की मला खिडकीतून कोणीतरी बोलावतय,मला टेप मध्ये जळालेले डोळे दिसत आहेत, आम्हाला कुणालाच ओळखत नव्हती,आम्ही कुणी तिच्याजवळ गेलो असता आम्हाला लांब ढकलायची.
त्या रात्री आमच्या तिन्ही भावंडाचे रडुन बेहाल झाले… नंतर माझ्या बहिणीला झोप लागली तेव्हा तिला खूप भयानक असे स्वप्न पडले …त्यात ती त्या ओढयाजवळ होती…आणि तिथे एक माणूस प्रेतांजवळ बसून मिश्कील पणे हसत होता… ती हे सर्व लपून पाहत होती…तेवढयात त्याची नजर बहिणीवर पडली तसे तो तिच्यामागे धावत सूटला…ती घाबरून बचावासाठी पळत होती….तसेच ती ओरडून झोपेतून जागी झाली आणि रडू लागली… वडिलांचा तर धीरच सुटत चालला होता.
एकीकडे आई आणि एकीकडे मुलीला असे रडताना पाहून त्यांच ह्दय तीळ तीळ तुटत होते.. माझ्या वडिलांना,आईला व बहिणीला असे पाहुन माझी अवस्था पण काही वेगळी नव्हती… मी माझ्या वडिलांना पहिल्यादयांच एवढे असहहाय पाहत होते… लहान भाऊ तर घाबरून अंगावर चादर घेऊन मुसमुसत होता.. कशीबशी ती भयाण रात्र आम्ही जागुन काढली. एवढे होऊन पण सकाळी आई काही घडलेच नाही अशी वागत होती….घरात गँस सिलिंडर फुल भरलेला असताना वडिलांना एकसारखे राँकेल आणायला सांगत होती.
तेव्हा वडिलांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.. त्यांनी मला साईड ला बोलवून आईवर बारीक लक्ष ठेवण्यास सागुंन वाण्याच्या दुकानात काकाला फोनवर घडलेला सर्व प्रकार सागंण्यासाठी निघून गेले… त्या काळी आजच्या सारखे फोन किवा स्मार्टफोन वापरले जात नसत..कुणाला फोन करायचा असल्यास एखाद दोघांकडे लँडलाईन फोन असत…लोक तेच फोन गरजेच्या वेळी वापरत असत…
वडिलांनी काका,आजी (वडिलांची आई),आजी (आईची आई) असे सर्वांना सांगितले व तात्काळ बोलवुन घेतले…तोपर्यंत आई काही झालेचं नाही असे वागत होती. आईची आई नाशिकलाच रहायला असल्याने २ तासातच पोहोचली, आईला पाहून तिला खूप रडायला आले व ती तिला बिलगून रडु लागली.
आईला काहीच समजत नव्हते कि आजी अशी अचानक कस काय घरी आली आणि तिला जवळ घेऊन रडते का आहे…काका पुण्याला राहायला असल्याने त्यांना पोहोचायला जरा उशीरच झाला…सर्व जण घरी आल्यावर आईला पाहिले व आजीने आईला माहेरी (नाशिक ला) घेऊन जाण्याचा निर्णय घेतला… जसे आईला हे समजले तसे आईच्या वागण्यात अचानक बदल झाला…पुन्हा चिडचिड पणा करु लागली… माझी काकी भाजी चिरत होती तर तिला रागाने बघत होती आणि बोलत होती…”ए तो चाकु साईड ला ठेव”…..रडत होती.
मोठ्याने किचांळत होती… माझ्या वडिलांना जाऊन बिलगली आणि रडुन बोलत होती”मला नाही जायचे कुठेच”…शेवटी आजीने आईला जवळ घेऊन शांत केले… त्यांनी दुसऱ्या दिवशी आईला नाशिक ला घेऊन जायचा निर्णय घेतला…
त्या रात्री आई एकदम शांत झोपली.. कारण माझी आजी सप्तशृंगी देवीची भक्त आहे.. त्यामुळे आजी शेजारीच आई झोपलो… त्या रात्री आईला काहीच त्रास नाही झाला..पण माझी बहिण सोफ्यावर झोपली असताना तिला परत लागोपाठ दोन स्वप्न पडले.
एक स्वप्न असे कि…ती झोपली आहे आणि अचानक तिला जाग आली आणि तिची वर फँन वर नजर गेली असता तिला फँन ला दोन लटकलेले पाय दिसले…आणि दुसरे असे कि…ती सोफ्यावर झोपली असताना… सोफ्याशेजारी एक पांढरी साडी घातलेली आणि केस मोकळे सोडलेली बाई तिच्याकडे एकटक पाहून गाणे गुणगुणत आहे…. हे स्वप्न पाहून माझी बहिण झोपेतच रडायला लागली…आम्ही सर्व ऊठलो…व तिला वडिलांनी जवळ घेऊन शांत केले… आणि विचारले असता तिने आम्हाला सर्व सांगितले तेव्हा आजी अजुनच घाबरली…तिने बहिणीलाही सोबत नेण्याचा निर्णय घेतला.
ठरल्याप्रमाणे आजी-आजोबा आई आणि बहीणीला घेऊन नाशिक साठी रवाना झाले…तिकडे जाऊन आईला व बहिणीला घेऊन वणी देवीचे दर्शन घेतले…आणि दवाखान्यात पण दाखवले… आईची तब्येत सुधारु लागली… बहीणीला जे स्वप्न पडायचे तेही बंद झाले… तसेच माझ्या आजी (वडिलांची आई) नेही बाहेरची काही बाधा आहे का काही दुसरे आहे पाहिले असता…सांगण्यात आले की ” खुप मोठ्या संकटातुन वाचले तुम्ही” आणि अजूनही संकट पुर्णपणे गेलेले नाही… करणी करण्यात आली आहे…आणि करणी करण्याऱ्याचे नावही सांगितले.
पण आजी नाव एकुन हैरान झाली… तिला काय करावे आणि काय नाही हेच नव्हते सुचत..कारण करणी करणारे कुणी दुसरे तिसरी नसुन माझी मोठी चुलती होती..जी आमच्या घराशेजारी राहायला होती…आमचे चांगले होऊ नये….वाईट व्हावे…एकंदरीत कौटुंबिक कलहातुन आणि जळक्या प्रव्रूती मुळे करणी करण्यात आली होती…..हे तेव्हाच आमच्या लक्षात आले जेव्हा रात्री मध्ये आईला एवढा त्रास होत होता तरी चुलती साधी विचारपुस करायला सुद्धा नाही आली.
आजीने खूप विचार केला व तिने करणी नका उलटवु असे सांगितले.. फक्त करणीचा असर नाही व्हायला पाहिजे असे काहीतरी करा..अशी गळ घातली..पण समोरुन उत्तर आले की हे सहजासहजी शक्य नाही..एकतर करणी पलटवा नाहीतर असर कमी करून फायदा नाही.. तुमच्या सुनेला आणि तिच्या कुटुंबाला नेहमी काही ना काही त्रास होणार….माझे वडील चिडले आणि म्हणाले…”काही नाही होणार… जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मला व माझ्या कुटुंबाला धक्का ही नाही लागुन देणार….या जगात दानव आहेत तर देव सुद्धा आहेत…मला देवावर पुर्ण विश्वास आहे… तारेल तो आम्हाला”.
जेव्हा पासून हे सर्व माझ्या आईसोबत घडले आहे त्या दिवसापासून माझी आईची तब्येत आजपर्यंत खराबच असते..तिला काही हानी नाही झाली पण जशी माझी आई पुर्वि होती ती तशी राहीलीच नाही…एकेकाळी ती सर्व सुनांमध्ये सर्व कामामंध्ये पुढे असणारी,चुणचुणीत, एक्टीव,हुशार, बुद्धीने तल्लख अशी तिची सर्व घरामध्ये ओळख होती..पण ति मानसिक रू्ग्ण आहे अस डाँक्टरांनी घोषित केले आहे… गेले २० वर्ष ती मनोरुग्ण डाँक्टर कडे उपचार घेत आहे…रात्री तिला झोप लागत नाही..गोळ्या घेते तेव्हाच तिला झोप लागते… काही आठवत नाही… पहिल्या सारखे जास्त काम होत नाही…सतत आजारपण… त्यामुळे ती एकदम शांत असते… आम्ही ही तिला खूप जपतो.
पण बोलतात ना आपल्या कर्माचे फळ आपल्याला ईथेच भेटते..तसेच ज्या लोकांनी आईची अशी हालत केली त्यांचे फळ त्यांना भेटत आहे… आम्ही कसारा सोडल्यानंतर माझ्या मोठ्या काकांना ब्रेन ट्युमर झाला त्यामुळे त्यांचे निधन झाले.. त्यांचे तिन्ही मुले १० वी नापास झाले… त्यामुळे त्यांना काही कामधंदा नाही… सर्व चुलती ला भेटण्यार्या पेन्शन वर चालते..पण आम्ही तिघांनेही चांगले शिक्षण घेतले आणि आजही समाधानकारक आयुष्य जगत आहोत…वडिलांची पण खुप प्रगती होत आहे…आईलाही आम्ही आनंदी ठेवतो…ऐकंदरीत आंनदी आयुष्य जगत आहोत.
समाप्त
Marathi Story – प्रज्ञा राऊत.
You May Like –
i} Best Love Quotes
ii} Love Shayari Marathi
Sayri Ki Dayri, Marathi Shayari,
Pati Patni Status, Dard Bhari Shayari,
Friends Shayari, Gulzar Quotes,
Motivational Quotes In Hindi,
Funny Shayari, Dosti Shayari,
Shayari Photo, Friendship Shayari,
Hindi Quotes, Hot Shayari,
Birthday Shayari, Love Status,
Sad Status, Whatsapp dp
Hindi Status, Marathi Story.
Share This Marathi Story To Social Media, I Hope You Enjoyed Marathi Story.
You can also find us on Twitter, Facebook
2022.